रायगड : नागाव ग्रामपंचायत शेजारी शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य डॉ. सचिन शरद राऊळ यांच्या सुसज्य अशा जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन आज आमदार महेंद्रशेठ दळवी यांच्या हस्ते करण्यात आले.
डॉ. सचिन राऊळ यांचा आदर्श घेऊन प्रत्येक जिल्हा परिषद सदस्याने आपल्या भागात जनसंपर्क कार्यालय सुरू करावे असे आवाहन आमदार महेंद्र दळवी यांनी याप्रसंगी केले. शिवसेनेच्या जनसंपर्क कार्यालयातून लोकाभिमुख आणि जनसेवेचे कार्य अधिक प्रभावीपणे होईल असा विश्वासही आमदार दळवी यांनी व्यक्त केला. जनसंपर्क कार्यालयामुळे शिवसेनेची पक्षसंघटना अधिक मजबूत होईल असे दळवी म्हणाले.
जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यास प्राधान्य देणार व पक्षसंघटना वाढीसाठी प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही यावेळी डॉ. सचिन राऊळ यांनी दिली.
यावेळी बोलताना आमदार महेंद्र दळवी यांनी डॉ. सचिन राऊळ यांच्या आदर्शाचा दाखला देत रायगड जिल्ह्यातील प्रत्येक जिल्हा परिषद सदस्याने आपल्या कार्यक्षेत्रात जनसंपर्क कार्यालय सुरू करावे, असे आवाहन केले. जनसंपर्क कार्यालय हे केवळ पक्षाचे कार्यालय न राहता सामान्य नागरिकांच्या अडचणी आणि समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्याचे प्रभावी माध्यम ठरले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. शिवसेनेच्या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून लोकाभिमुख आणि जनसेवेचे कार्य केले जाईल. तसेच या कार्यालयामुळे पक्षसंघटना अधिक मजबूत होण्यास मदत होईल, असा विश्वासही आमदार दळवी यांनी व्यक्त केला. डॉ सचिन राऊळ यांच्या या जनसंपर्क कार्यालयाला आमदार महेंद्र दळवी,रायगड जिल्हा परिषद सदस्या मानसीताई दळवी, अर्थ व शिक्षण समितीचे सभापती चंद्रकांत विष्णू कळंबे, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती रसिका राजाभाई केणी, शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख राजाभाई केणी, जिल्हा परिषद सदस्य दिलीप भोईर, रायगड उपजिल्हाप्रमुख शैलेशदादा चव्हाण, अनंत नारायण गोंधळी, अदिती अभिराज दळवी, तनुजा घरत,विघ्नेश माळी, भाग्यदा पाटील, संतोष निगडे, अंकिता घरत, शरद गोंधळी तसेच ज्येष्ठ शिवसैनिक छाया विष्णुभाई आचारकर यांच्यासह शिवसैनिक, ग्रामस्थांनी शुभेच्छा दिल्या.