लांजा : (गोविंद चव्हाण) लांजा येथील छत्रपती शिवाजी नगर, सामंत पटांगणात सामंत कुटुंबीय यांच्या वतीने भव्य आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. यामध्ये तीस स्पर्धकांची निवड करण्यात आली.

या कार्यक्रमाला पालकमंत्री उदय सामंत, आमदार किरण सामंत, अण्णा सामंत तसेच शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

स्पर्धेत सुमारे २५ विद्यार्थी-विद्यार्थिनी स्पर्धेत धावताना दम लागून अत्यवस्थ झाल्याने त्यांना लांजा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी लक्ष्मीकांत सुरनर तसेच स्वामी समर्थ हॉस्पिटलचे डॉ. सुहास खानविलकर यांनी या विद्यार्थ्यांवर उपचार सुरू केले.

या स्पर्धेत एकूण १०५० विद्यार्थी व विद्यार्थीनी सहभागी झाले होते. त्यातील ३० जण स्पर्धेत यशस्वी झाले. त्यांची नावे खालीलप्रमाणे आहेत.

१२ वर्षांतील मुले व मुली :
सनीदेओल राजू पासवान, सत्येम सचिव पवार, साहील सोमनाथ पवार, वर्धन विकास जाधव, वेध रमाकांत हरमले, श्रावणी संतोष मोरे, आरूषी अमोल गुरव, आराध्य विद्याधर करंबेळे, वैष्णवी काशिनाथ दिनकर, माही शशांक उपशेट्ये.

१४ वर्षांतील गट :
बॉबीदेओल राजू पासवान, आर्यन रोहित पासवान, आदित्य अजय माटल, अथर्व रमेश भोवड, हार्दिक रमेश कुरूप, आराध्य गुरुदास माने, स्वप्ना संतोष मोरे, आर्या विजय टोले, शीतल राजेंद्र गुरव, वंदना अमित नामये.

१६ वर्षे गट :
स्वयं संजय चाच्चे, सोहम सहदेव करूलकर, प्रसाद अनिल चापटे, संस्कार संजय चव्हाण, राज उमेश नामये, स्वरा संजय उपशेट्ये, मानवी सूर्यकांत बडंबे, सिद्धी संजय मोसमकर, पूर्वा सत्यवान राणे, श्रेया संदीप घडशी हे विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले.