मुंबई : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन यांच्या सभास्थळाचे ‘शुद्धीकरण’ करून दलितांचा अपमान केल्याच्या निषेधार्थ आणि या घटनेविरोधात आवाज उठवल्याबद्दल राहुल गांधी यांच्यावर गुन्हा दाखल केल्याच्या निषेधार्थ मुंबई युवक काँग्रेसने भाजपा कार्यालयासमोर मनुस्मृतीच्या प्रती जाळून आंदोलन केले.
या आंदोलनाप्रकरणी मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन यांच्यासह कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलीस रात्रभर त्यांचा शोध घेत आहेत..
झीनत शबरीन यांच्यासह युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आज सकाळी ८.३० वाजता भोईवाडा पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण करणार आहेत.
📍 स्थळ: भोईवाडा पोलीस ठाणे, मुंबई
🕣 वेळ: सकाळी ८.३० वा.