लांजा : लांजा राजापूर साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांची मुलगी अपुर्वा किरण सामंत हिचा वाढदिवस,जन्मदिन हजारोंच्या उपस्थितीत गणेश मंगल कार्यालय लांजा येथे धुमधडाक्यात साजरा करण्यात आला.

या वेळी धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रम पार पडले महीलांच्या फुगड्यांचे संघ १३होते.व ह.भ.प.सोनुबाबा कुर्णेकर पायी दिंडीचे संस्थापक ह.भ.प.संतोष महाराज कुर्णेकर यांचा माऊली हरीपाठ झाला या मध्ये भांबेड,प्रभानवल्ली,लांजा,माजल,व्हेळ,रिंगणे, बोरथडे,इंदवटी व अन्य गावतील वारकरी भाविक लोक मोठ्या प्रमाणात उपस्थित राहुन हरीपाठा सहभागी झाले होते.
उपळे,जवडे,इंदवटी,निवोशी, पडवण,असोडे मट,ईसवली,कुर्णे, कोट ,पडवण,आसगे,कोट या गावच्या महीला मंडळी यांच्या फुगडी झिम्मा पारंपारिक पद्धतीने संपन्न झाली. प्रत्येक संघाला स्मृती चिन्ह प्रमाण पत्र व बक्षीस देण्यात आले.व माऊली हरीपाठाचे प्रमुख संतोष महाराज कुर्णेकर यांचा नगराध्यक्ष सावली कुरूप यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला शिवसेना तालुकाप्रमुख गुरुप्रसाद देसाई यांच्या उपस्थितीत झाला.