चिपळूण : उष्माने नागरिक हैराण झालेले असताना आज गुरुवारी सायंकाळी सहा वाजता शहराजवळच्या पाग,कापसाळ, कामथे भागाला जोरदार पावसाने चांगले झुडपून काढले.
चिपळूणमध्ये सायंकाळी अचानक आकाशात ढग जमा झाले, वारा वाहू लागला आणि जोरदार पाऊस पडणार असे वातावरण तयार झाले होते. मात्र पाग पासून चिंचनाका किंवा बहादूरशेख पर्यंत पावसाचा किरकोळ सरी बरसल्या तर पाग बायपास हायवे पासून पुढील कापसाळ कामथे पर्यंतच्या भागात तुफान पाऊस बरसला. ढगांचा गडगडात आणि विजांचा कडकडाट ही सुरू होता.तर शहरात मात्र वातावरण ढगाळ बनले होते.