मुरुड जंजिरा (सुधीर नाझरे )
7 फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य निवडून आणण्यासाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.मुरुड तालुक्यात दोन जिल्हा परिषद सदस्य व चार पंचायत समिती सदस्य निवडून येणार आहेत.यासाठी उद्या सकाळ पासून मतदान प्रक्रिया सुरू होणार असल्याने निवडणुकीचे काम करण्यासाठी नियुक्त शाळेचे शिक्षक व विविध कार्यालयातील कर्मचार आज सकाळीच मुरुड तहसील कार्यालयात हजर होऊन सर्वांनी मतदानाचे साहित्य ताब्यात घेऊन आपले केंद्र ताब्यात घेण्यासाठी रवाना झाले आहेत.
मुरुड पोलिस ठाण्याकडून चोख पोलिस बंदोबस्त व अतिरिक्त पोलिस कर्मचारी निवडणुकीचे काम करण्यासाठी तैनात करण्यात आले आहेत. मुरुड तालुक्यात 55 हजार पाचशे बावन्न मतदार असून उद्या ते आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मुरुड तालुक्यात पूर्वी 71 मतदान केंद्र होती आता ही केंद्र 81 वर पोहचली आहेत. अकराशेच्या वर मतदान असणाऱ्या केंद्राची संख्या वाढवण्यात आली आहे. त्यामुळे मतदान सुरळीत होण्यास मदत होणार आहे. ग्रामीण भागातील लोक मुंबई येथे कामास असतात परंतु त्यांचे मतदान गावाकडे असल्याने आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी शेकडो च्या संख्येने लोक गावाकडे आपले मतदान करण्यासाठी येणार आहेत. यासाठी विशेष बस बुक करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. मुंबई कडील लोक गावात येणार असल्याने मतदानासाठी मोठी गर्दी होणार आहे. प्रचाराच्या तोफा थंडावल्या असून उद्या होणाऱ्या मतदानासाठी लोक उत्सुक दिसून येत आहे.
▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻
🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻
🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻
https://chat.whatsapp.com/GLUI6https://chat.whatsapp.com/GLUI6mjYZfeARsSectAexY
