छत्रपती संभाजीनगर: आज छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथे विभागीय आयुक्त मा. श्री. जी. श्रीकांत यांची भेट घेऊन शिरूर शहरातील मतदार यादीतील बोगस नावांसंदर्भात सविस्तर तक्रार दाखल केली.

SIR प्रक्रियेनंतर शिरूर शहरातील मतदार यादीत समाविष्ट करण्यात आलेल्या सर्व नावांच्या कागदपत्रांची सखोल पडताळणी करण्यात यावी, अशी मागणी केली.

विशेषतः शिरूर शहराचे रहिवासी नसतानाही मतदार यादीत नावे समाविष्ट करण्यासाठी बोगस पीटीआर (प्रॉपर्टी टॅक्स रेकॉर्ड), बनावट रेशन कार्ड, आधार कार्ड तसेच इतर बनावट कागदपत्रे तयार करून त्यांचा वापर करण्यात आल्याच्या तक्रारींची सखोल चौकशी करण्यात यावी. अशा बोगस कागदपत्रांच्या आधारे मतदार यादीत नावे नोंदविणाऱ्यांसह संबंधित दोषींवर कठोर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी ठाम मागणी यावेळी केली.

या तक्रारीची गंभीर दखल घेत विभागीय आयुक्त श्री. जी. श्रीकांत यांनी तातडीने चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

मतदार यादीतील बोगसगिरी उघडकीस आणून लोकशाही प्रक्रियेची पवित्रता आणि निवडणूक व्यवस्थेची पारदर्शकता टिकवण्यासाठी आमचा लढा सुरूच राहील!