मुंबई (विशेष प्रतिनिधी) : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई ते सावंतवाडी या नव्या रेल्वे सेवेचा शुभारंभ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्री नितेश राणे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला.

केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि मंत्री पियुष गोयल यांनी ऑनलाईन शुभेच्छा दिल्या.. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस च्या फलाट क्रमांक 18 वरून ही गाडी सावंतवाडीच्या दिशेने रवाना झाली आहे यावेळी चाकरमान्यांमध्ये विशेष उत्साह दिसून आला. कोकण रेल्वे ही चाकरमान्यांसाठी जीवन वाहिनी आहे. अशा शब्दात मंत्री महोदयांनी शुभेच्छा दिल्या.