लांजाः गोविंद चव्हाण ,पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रामध्ये वेरवली बुद्रुक या गावांमध्ये काल दिनांक रोजी 30 ते 35 वयोगटातील एक युवक बेवारस मानसिक स्थिती बिघडलेल्या अवस्थेत भटकताना आढळून आला त्याला संरक्षणाची गरज असल्यामुळे त्यास पोलिस ठाणे येथे आणून त्याच्याकडून नातेवाईकांची माहिती उपलब्ध होत नव्हती त्याचे खिशात असलेल्या कागदावरून एक मोबाईल नंबर उपलब्ध झाला व त्यावर कॉल केला असता त्याचे नातेवाईक भिवंडी शिवाजीनगर परिसरात राहत असल्याचे समजून आले.
त्यांचे नातेवाईकांना तात्काळ लांजा येथे येण्याबाबत सूचना देण्यात आल्या तसेच सदर व्यक्तीस सुरक्षिततेसाठी भाकर संस्थेत ठेवण्यात आले होते आज रोजी त्याचे नातेवाईक भिवंडी शिवाजीनगर येथून पोलीस ठाणे येथे आले त्यांचे कडून माहिती घेता सदर व्यक्तीचे नाव मोहम्मद मुस्तकीम मासूम वय 23 राहणार भिवंडी शिवाजीनगर ठाणे असे असल्याचे समजले सदरचा व्यक्ती हा गेले एक वर्षापासून घरातून बेपत्ता झालेला होता त्याचे नातेवाईकांची ओळख पटवून त्यांच्या ताब्यात सदर व्यक्तीस देण्यात आलेले आहे. सदर कामी भाकर संस्थेचे श्री पाटील तसेच वेरवली गावचे पोलीस पाटील कुळये यांचे सहकार्य लाभलेले आहे.
