चिपळूण : रोटरी क्लब ऑफ चिपळूण च्या वतीने काल एक जुलै रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरामध्ये अनेक विद्यार्थी आणि नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रामध्ये आयोजित या शिबिरात सकाळी साडेनऊ वाजल्यापासून दुपारी तीन वाजेपर्यंत तब्बल 63 रक्ताचे पॅकेट्स संकलन करण्यात आले. यावेळी सहभागी झालेल्या शिबिरार्थ्यांना रेड क्रॉस आणि रोटरी तर्फे प्रशस्तीपत्र देण्यात आले.
रोटरी क्लबच्या डिस्ट्रिक्ट 3170 च्या वतीने एक जुलै या दिवशी महाराष्ट्र गोवा आणि कर्नाटकाच्या अनेक भागांमध्ये एकाच दिवशी रक्तदान शिबिर घेण्यात आले.
चिपळूण मध्ये भेडसावणारा अपुरा रक्त साठा, वैद्यकीय सुविधा याचा विचार करता रोटरी क्लब ऑफ चिपळूण तर्फे हा उपक्रम राबविण्यात आला. कार्यक्रमाचा शुभारंभ रोटरी क्लब ऑफ चिपळूणचे नूतन अध्यक्ष शैलेश दादा टाकळे यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रोजेक्ट चेअरमन, अंकुश गांधी मनोज जैन दिनकर पवार प्रशांत देवळेकर यांनी नियोजन केले. शिबिराला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल नूतन अध्यक्ष शैलेश दादा टाकळे, सचिव रोहन देवकर आणि खजिनदार मंगेश गोंधळेकर यांनी समाधान व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ चिपळूणच्या सर्व सदस्यांनी मेहनत घेतली.