खेड : खासदार सुनीलजी तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नामदार कु. आदितीताई तटकरे (महिला व बालविकास मंत्री) तसेच आमदार श्री. अनिकेतभाई तटकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत तिसे-सकपाळवाडी येथील नवतरुण मित्र मंडळाच्या पदाधिकारी व सदस्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.
तिसे-सकपाळवाडी येथे झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्यास जिल्हा परिषद सदस्य अजय बिरवटकर, पंचायत समिती सदस्या सौ. अपूर्वा जाधव, मनोज कदम आणि हर्षल जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पक्षात प्रवेश केलेल्या पदाधिकारी व सदस्यांचे स्वागत करण्यात आले. पक्षात प्रवेश केलेल्यांमध्ये अध्यक्ष अनंत सकपाळ, सचिव संतोष सकपाळ, खजिनदार सदानंद सकपाळ आणि उपखजिनदार रुपेश सकपाळ यांच्यासह गणेश सकपाळ, शैलेश सकपाळ, वसंत सकपाळ, दिलीप सकपाळ, विश्वनाथ सकपाळ, स्वप्नील सकपाळ, अजिंक्य सकपाळ, अभिजित सकपाळ, विजय सकपाळ, आयुष्य सकपाळ, सुशांत सकपाळ, लक्ष्मण सकपाळ, अक्षय सकपाळ, शुभम सकपाळ, सुनील सकपाळ, अनिकेत सकपाळ आणि देवजी सकपाळ यांचा समावेश आहे.
यावेळी नव्याने पक्षात प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक कार्यात सक्रिय सहभाग घेण्याचा निर्धार व्यक्त केला. या पक्षप्रवेशामुळे तिसे-सकपाळवाडी परिसरातील पक्ष संघटनात्मक कार्याला बळ मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.