दसपटी (चिपळूण)- चिपळूण तालुक्यातील कळकवणे दादर या ग्रुप ग्रामपंचायतीच्या महात्मा गांधी तंटामुक्ती अध्यक्षपदी कळकवणे गावचे सुपुत्र श्री. मनोहर महादेवराव शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी तंटामुक्ती समिती स्थापन करण्यात आली, या समितीमध्ये अध्यक्षपदी श्री. मनोहर महादेवराव शिंदे यांची  निवड करण्यात आली व खालील प्रमाणे समिती गठीत करण्यात आली 

श्री मनोहर शिंदे (अध्यक्ष), सौ सविता निकम (सरपंच), सौ सुरेखा गमरे (उपसरपंच, मागास वर्ग प्रतिनिधी), ऍड अमित कदम (वकील प्रतिनिधी), श्री सिद्धेश शिंदे (पदवीधर), श्रीम. जयश्री भागवत खेडकर (मुख्याध्यापक प्रतिनिधी), श्री किशोर शिंदे (माजी सैनिक), श्री दीपक शिंदे (माजी निवृत्त पोलीस अधिकारी) श्री संकेत कदम (व्यापारी प्रतिनिधी), अरुण कदम(प्रभावी व्यक्ती), प्रभावी व्यक्ती – बळवंतराव शिंदे, रमेश नांदळसकर, श्री संजीवन झुजम, श्री श्रीराम कदम. सौ रितू घडशी व जान्हवी सकपाळ ( महिला बचत गट प्रतिनिधी), पंढरी लाड (युवक प्रतिनिधी) हसमत चिपळूणकर ( अल्पसंख्यांक प्रतिनिधी) शशिकांत जाधव (ग्रामसेवक), मनीष शिंदे (ग्राम महसूल अधिकारी) जागृती पवार (पोलीस पाटील), योगेश हुंबरे (बिट अंमलदार )
सदर सभेला ग्रामपंचायत सदस्य एम.डी.शिंदे, अनुराधा पवार,तनया धुळप,मानसी कदम माजी सरपंच अरुण कदम,संजय शिंदे,मंगेश शिंदे,प्रितेश सुर्वे, मंगेश कदम,संजय कदम, राजेंद्र शिंदे, महेंद्र मिसाळ,विजय सुर्वे,आरोग्य विभागाचे श्री.पाटील.सौ.खंदारे मॅडम,आदी ग्रामस्थ उपस्थित होते