चिपळूण : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, चिपळूण आणि शेखर निकम मित्र मंडळ आयोजित दहीहंडी उत्सव व सांस्कृतिक कार्यक्रम २०२६ च्या स्टेज व सजावट कामाचा श्रीफळ वाढवून शुभारंभ आज बुधवार दिनांक ०२/०९/२०२६ रोजी मोठ्या उत्साहात पार पडला.
शिवाजी चौक, अजिंक्य आर्केट, चिंचनाका-चिपळूण येथे होणाऱ्या या भव्य दहीहंडी उत्सवासाठी (दि. ५/०९/२०२६) तयारीची अधिकृत सुरुवात करण्यात आली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष श्री. मिलिंद कापडी, महिला शहराध्यक्षा सौ. आदिती देशपांडे, संदीप जागुष्टे, योगेश पवार, विजय चितळे, उमेश काटकर, मनोज जाधव, सचिन पाटेकर, उदय ओतारी, राहुल लोटेकर, मिलिंद गुरव, वरुण (दादू) गुडेकर, अक्षय कुडाळकर, रघुनाथ भालेकर, अल्लाद यादव, सचिन साडविलकर, प्रमोद लोटेकर, विनायक पाटेकर, सुयोग चौधरी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी दहीहंडी उत्सव भव्य दिव्य आणि यशस्वी करण्यासाठी एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. आमदार मा. शेखरजी निकम साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा उत्सव चिपळूणकरांसाठी एक पर्वणी ठरणार असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
