दापोली : लायन्स क्लब दापोलीच्या वतीने Permanent Activity संदर्भात दापोली नगरपंचायतीसोबत आयोजित करण्यात आलेली बैठक आज सकारात्मक वातावरणात पार पडली.
बैठकीमध्ये लायन्स क्लब दापोलीच्या वतीने पर्यटकांसाठी Information Centre तसेच नागरिकांसाठी Open Gym या दोन महत्त्वपूर्ण संकल्पना मांडण्यात आल्या. या दोन्ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी आवश्यक असलेली जमीन सध्या नगरपंचायतीच्या अखत्यारित नसून PWD विभागाच्या अखत्यारित असल्याचे चर्चेत समोर आले.
सेच बुरोंडी नाक्याजवळील जमीन नगरपंचायतीच्या अखत्यारित येत असल्यास, त्या ठिकाणी Information Centre व Open Gym यांसारखे समाजोपयोगी उपक्रम विकसित करण्याबाबत चर्चा करण्यात आली. त्यानुसार लायन्स क्लब दापोलीच्या वतीने नगरपंचायतीसमोर ठोस उपक्रमाचा प्रस्ताव ठेवण्यात आला असून, नगरपंचायतीनेही या संकल्पनांचे सकारात्मक स्वागत केले.
या बैठकीस नगराध्यक्षा कृपा घाग लायन्स क्लब दापोलीचे अध्यक्ष लायन गुरुप्रसाद बेर्डे, खजिनदार लायन फजल रखांगे, लायन सुजय मेहता, लायन आशिष मेहता, लायन श्रीराम मजलेकर, लायन मनोहर जैन आणि लायन महेंद्र जैन उपस्थित होते.
या उपक्रमामुळे दापोलीच्या पर्यटन विकासाला चालना मिळण्याबरोबरच नागरिकांसाठी आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. पुढील काळात जागा व आवश्यक प्रशासकीय बाबींचा विचार करून या उपक्रमाला मूर्त स्वरूप देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.
लायन्स क्लब दापोलीचे अध्यक्ष लायन गुरुप्रसाद बेर्डे म्हणाले,
“Permanent Activity ही दापोलीच्या नागरिकांना आणि पर्यटकांना दीर्घकाळ उपयोगी पडणारी असावी, हा आमचा प्रयत्न आहे. Information Centre आणि Open Gym या दोन्ही संकल्पना दापोलीच्या विकासासाठी निश्चितच उपयुक्त ठरतील. नगरपंचायतीने या प्रस्तावाचे केलेले सकारात्मक स्वागत ही आमच्यासाठी आनंदाची बाब असून, पुढील कार्यवाहीसाठी लायन्स क्लबकडून आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल.”