चिपळूण : बाजारपेठेतील एका दुकानात काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांची छेड काढणाऱ्या तरुणाला त्या महिलेच्या भावाने बदडल्याची घटना काल शुक्रवारी दुपारी तीन चा सुमारास घडली . या प्रकारानंतर रात्री चिपळूण पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रार दाखल करण्यात आली .
तक्रारदार महिला व संबंधित इसम दोघेही एकाच दुकानात कामाला आहेत . इसमाला सांगूनही त्याच्यात सुधारणा न झाल्यामुळे अखेर महिलेचा भावाने त्याला चांगलाच चोप दिला .
चिपळूण बाजारपेठेत महिलेची छेड काढणाऱ्याला चोपले
