रायगड : रायगडच्या लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचा २८वा दीक्षांत समारंभ मोठ्या दिमाखात आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
महाराष्ट्राचे राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती जिष्णू देव वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या भव्य सोहळ्यात विविध अभ्यासक्रमांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली, तर सुवर्णपदक प्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांचाही विशेष सन्मान करण्यात आला.
या सोहळ्याला उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, रायगडचे पालकमंत्री भरत गोगावले, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. राजनीश कामत, विद्यापीठाचे अधिकारी, प्राध्यापक, विद्यार्थी आणि पालकांची उपस्थिती होती.
अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात नवी क्षितिजे गाठण्यासाठी सज्ज झालेल्या विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वाचा गौरव करणारा हा दीक्षांत सोहळा त्यांच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण ठरला.