चिपळूण – वक्तृत्वोत्तेजक सभा, पुणे आयोजित वसंत व्याख्यानमालेच्या १५२ व्या वर्षी बाजीराव पेशवे स्मृति व्याख्यान देण्यासाठी चिपळूणचे सुपुत्र, इतिहास अभ्यासक सुधांशु नाईक यांचे “अपराजित धुरंधर सेनानी थोरले बाजीराव पेशवे” या विषयावर मंगळवार, २८ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता टिळक स्मारक मंदिर, लोकमान्य टिळक रोड, पुणे येथे यांना संधी मिळाली आहे.
वक्तृत्वोत्तेजक सभा, पुणे आयोजित वसंत व्याख्यानमालेच्या १५२ व्या वर्षी प्रा. मिलिंद जोशी, सुदर्शन हसबनीस, राजसाहेब ठाकरे, नीलम गोऱ्हे, आदित्य अभ्यंकर, राहुल देशपांडे, डॉ. अभिजित सोनवणे, हेरंब कुलकर्णी, डॉ. वासुदेव परळीकर, शिरीष देशपांडे, वर्षा तोडमल, आनंद आगाशे, श्रीहरी मांडवगणे, अनुराधा करकरे आणि चिपळूणचे सुपुत्र सुधांशु नाईक या मान्यवर व्याख्यात्यांची व्याख्याने होणार आहेत.