लांजा : श्रावणातील मंगलमय वातावरण, पारंपरिक खेळांची रंगत, हास्य-विनोदाचा उत्साह आणि महिलांच्या आनंदाने लांजा येथील वातावरण अक्षरशः भारावून गेले. शिवसेनाप्रमुख वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त तसेच शिवसेनेच्या हिरक महोत्सवी वर्षानिमित्त शिवसेना लांजा तालुका व शहर महिला आघाडीच्या वतीने ‘श्रावण सरी-मंगळागौर’ या कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवार, दि. १० सप्टेंबर २०२६ रोजी कुलकर्णी-काळे येथील सभागृहात उत्साहात करण्यात आले.
मंगळागौर म्हणजे केवळ पारंपरिक खेळांचा उत्सव नव्हे, तर महिलांच्या आनंदाला, मैत्रीला, कलागुणांना आणि आपल्या समृद्ध संस्कृतीला उजाळा देणारा सण आहे. धावपळीच्या आधुनिक जीवनात हरवत चाललेल्या पारंपरिक खेळांना आणि श्रावणातील या सुंदर परंपरेला व्यासपीठ देत महिला आघाडीने महिलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याचे कार्य केले. त्यामुळे हा कार्यक्रम केवळ पक्षाचा उपक्रम न राहता संस्कृती आणि संघटन यांचा सुंदर मिलाफ ठरला.
शिवसेनेच्या विचारधारेत केवळ राजकीय संघर्ष नाही, तर समाजजीवनाशी नाळ जोडणाऱ्या परंपरा, संस्कृती आणि कुटुंबव्यवस्थेचे जतन यालाही महत्त्व आहे. त्याच भावनेतून महिला आघाडीने आयोजित केलेल्या या मंगळागौरीने महिलांना मनमुराद आनंद देतानाच पुढच्या पिढीपर्यंत आपल्या लोकपरंपरा पोहोचविण्याचा संदेश दिला.
या कार्यक्रमास शिवसेना दक्षिण रत्नागिरी जिल्हाप्रमुख दत्ताजी कदम, उपजिल्हाप्रमुख रविंद्र डोळस, लोकसभा महिला संघटक नेहा माने, जिल्हा महिला समन्वयक स्वरुपा साळवी, युवासेना जिल्हा विस्तारक श्रुतिका कदम, लांजा तालुका प्रमुख युवराज हांदे, शिवसहकार सेना जिल्हा संघटक चंद्रकांत शिंदे, महिला तालुका संघटक पूर्वा मुळे, युवासेना तालुका अधिकारी महादेव खानविलकर, शिवसहकार सेना तालुका संघटक सुवर्णा खेडेकर, महिला संपर्क संघटक देवरुख लक्ष्मण मोर्ये, विश्वास मांडवकर, विभागप्रमुख जितेंद्र कदम, सुभाष तावडे, राजेंद्र सुर्वे, शांताराम गुरव, संजीवकुमार राऊत, अल्लादिन नेवरेकर, विघ्नेश गुरव, आदित्य कामत, दिनेश गुरव, वैष्णवी साळवी, सरिता तावडे, सुशीला कांबळे, नगरसेविका पायल साळवी, आसावरी मांडवकर, युगंधरा हांदे, सपना तोडकरी, निवेदिका सौ. सुविधा हांदे, उमेश पडिलकर, सुभाष रामाणे, किरण बेर्डे सर, संतोष लिंगायत, सिया लोध, महेंद्र गांगण, गणेश खामकर, प्रकाश गुरव, सागर वायंगणकर, नन्या सुर्वे, बंडया लिंगायत, भाई राईन, भालचंद्र लाड, बाबा धावणे, सचिन लिंगायत, सौ. कावेरी गुरव, सौ. प्रतिभा गुरव, सौ. नेहा शिंदे, सौ. शिल्पा कांबळे, सौ. गार्गी खामकर, सौ. सायली तोडकरी. आदी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी उपजिल्हाप्रमुख रवींद्र डोळस यांचे मोलाचे सहकार्य लाभले. महिला आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घेतलेल्या परिश्रमामुळे कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
राजकारणाच्या पलीकडे जाऊन समाजाशी जोडणारे उपक्रम आणि संस्कृतीशी नाते दृढ करणारे उत्सव हीच संघटनेची खरी ताकद आहे. लांजा महिला आघाडीच्या ‘श्रावण सरी-मंगळागौर’ने याच संघटनशक्तीचा आणि सांस्कृतिक जिव्हाळ्याचा सुंदर प्रत्यय दिला.
