चिपळूण : आमदार शेखर निकम यांच्या पाठपुराव्याला यश आले असून, चिपळूण तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आला आहे. याबद्दल आमदार शेखर निकम यांनी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, पालकमंत्री आणि मदत व पुनर्वसन मंत्री यांचे आभार मानले आहेत.