चिपळूण : शारीरिक कसरत, तंदुरुस्ती, सहनशक्ती, दृढ निश्चय आणि स्वयंशिस्त हे सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असणारे गुण शालेय वयापासूनच मुलांमध्ये रुजावेत या उद्देशाने शिक्षण प्रसारक मंडळी पुणे यांच्याकडून आयोजित करण्यात आलेली बी आर जोशी क्रॉस कंट्री स्पर्धा शनिवार दिनांक १ ऑगस्ट २०२६ रोजी एसपीएम इंग्लिश मिडीयम स्कूल परशुराम येथे मोठ्या उत्साहात पार पडली.
शनिवार दिनांक १ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी पीएम परशुराम शाळेच्या सभागृहामध्ये सर्वप्रथम लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले यावेळी शाळा समितीचे अध्यक्ष श्री राघव अष्टेकर सर चिपळूण येथील रोटरी व रोट्रॅक्ट क्लबचे सर्व सदस्य उपस्थित होते.
यावेळी शाळा समितीचे अध्यक्ष श्री राघव अष्टेकर सर यांनी सर्व रोटरी क्लब व रोट रॅक्ट क्लब चिपळूणच्या उपस्थित सर्व सदस्यांचे त्यांच्या सहकार्याबद्दल आभार मानले सर्व स्पर्धकांना स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या.
त्यानंतर शाळेच्या मैदानावर सर्व स्पर्धकांचा वॉर्म अप सेशन मध्ये झुंबा घेण्यात आला व स्पर्धेसाठी आवश्यक सूचना देण्यात आल्या.
‘धावूया आरोग्यासाठी, शांततेसाठी…’ . हे ध्येय साध्य करण्यासाठी इयत्ता तिसरी इयत्ता आठवीच्या एकूण 550 विद्यार्थ्यांनी सोबतच त्यांचे शिक्षक आणि रोटरी आणि रोटरॅक्ट क्लबचे सदस्य यांनी देखील या स्पर्धेमध्ये मोठ्या उत्साहात सहभाग घेतला.
सदर स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे
इयत्ता तिसरी ते पाचवी गट १ मुले क्रमांक, पदक व एक किलोमीटर अंतर पूर्ण करण्यासाठी घेतलेली वेळ व पुढीलप्रमाणे
१. साई सुनील खरात – सुवर्ण पदक (2.51 मिनिटे )
२. दुर्वांक विश्वनाथ सावंत- रौप्य पदक ( 2.56 मिनिटे )
३. गौरांग जयवंत सैतवडेकर- कास्य पदक ( 2.58 मिनिटे )
४. अनिमेष सुधीर भुरण – कास्य पदक ( 2.59 मिनिटे )
५. तनिष धर्मपाल ठाकूर – कास्य पदक (3.03 मिनिटे )
इयत्ता तिसरी ते पाचवी गट १ मुली
क्रमांक, पदक व एक किलोमीटर अंतर पूर्ण करण्यासाठी घेतलेली वेळ व पुढीलप्रमाणे
१. आर्या नरेंद्र कनाल – सुवर्ण पदक (3.17 मिनिटे )
२. गार्गी अमित बुरटे- रौप्य पदक ( 3.27 मिनिटे )
३. परी राकेश चाळके- कास्य पदक ( 3.27 मिनिटे )
४. पायल धीरज सिंग – कास्य पदक ( 3.33 मिनिटे )
५. स्वर्णी सिद्धेश लके श्री – कास्य पदक (3.33 मिनिटे )
इयत्ता सहावी ते आठवी गट २ मुले
क्रमांक, पदक व दोन किलोमीटर अंतर पूर्ण करण्यासाठी घेतलेली वेळ व पुढीलप्रमाणे
१. समर्थ राजकुमार पवार – सुवर्ण पदक (5.59 मिनिटे )
२. वेदांग अमित जोशी – रौप्य पदक ( 6.24 मिनिटे )
३. इंद्र राघवेंद्र पवार – कास्य पदक ( 6.26 मिनिटे )
४. सानिध्य मंगेश खेराडे – कास्य पदक ( 6.37 मिनिटे )
५. सर्वेश संतोष बहुतले – कास्य पदक (6.37 मिनिटे )
इयत्ता सहावी ते आठवी गट २ मुली
क्रमांक, पदक व दोन किलोमीटर अंतर पूर्ण करण्यासाठी घेतलेली वेळ व पुढीलप्रमाणे
१. विश्वा विशाल गमरे – सुवर्ण पदक (7.34 मिनिटे )
२. रिया नितीन राणे – रौप्य पदक (7.59 मिनिटे )
३. माही अमित कदम- कास्य पदक (8.02 मिनिटे )
४. भक्ती दत्तात्रय आळगी – कास्य पदक ( 8.12 मिनिटे )
५. स्वागता सचिन चोगले – कास्य पदक (8.14 मिनिटे )
शिक्षिकांसाठी घेण्यात आलेल्या क्रॉस स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे
१. अवंतिका कदम -सुवर्णपदक
२. संगीता पाथरे- रौप्य पदक
३. रेणुका रेडीज – कास्यपदक
शिक्षकांसाठी घेण्यात आलेल्या क्रॉस कंट्री स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे
१. अभिजीत खानविलकर -सुवर्णपदक
२. महेश होमकळस- रौप्य पदक
३. राघव अष्टेकर – कास्यपदक
अशारीतीने स्पर्धा उत्सहात संपन्न झाल्या.
