चिपळूण : चिपळूण रेल्वे स्टेशन येथील शहरा बाजूकडील तिकिट खिडकी अनेक महिने बंद होती.कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकतभाई मुकादम यांनी रेल्व स्टेशन ला १५ दिवसापूर्वी भेट देऊन गणेश ऊस्त्वापूर्वी शहरा लागत ची खिडकी सुरू करावी अशी मागणी केली याची दखल घेऊन २ सप्टेंबर पासून ती खिडकी सुरू करण्यात आली आहे त्यामुळे गुहाघर तालुका व चिपळूण शहरा लगत असलेल्या अनेक गावतील रेल्वे प्रवाशांची व्यवस्था झाली आहे.
३ सप्टेंबर रोजी कोकण रेल्वे अन्याय निवारण समिती अध्यक्ष शौकतभाई मुकादम यांनी पुन्हा चिपळूण रेल्वे स्टेशन ला भेट देऊन पाहणी करून रेल्वे स्टेशन च्या मागच्या बाजूस प्रशासने समोरील बाजू प्रमाणे सुशोभीकरण करावे ,त्याचप्रमाणे रस्त्याचे डांबरी करण करावे अशी मागणी .
शहरा लगतची तिकिट खिडकी सुरू केल्या बद्दल रेल्वे प्रशासनाचे व कॉमर्शियल सुपरवायझर खांबे यांचे आभार मानले आहेत!