रत्नागिरी : जिल्ह्यातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या कार्यकारिणी बैठकीने केवळ संघटनात्मक हालचालींना वेग दिला नाही, तर आगामी वर्षभरासाठी पक्षाच्या व्यापक सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय कार्यक्रमांची ठोस रूपरेषाही स्पष्ट केली. रत्नागिरी येथील शिवसेना नेते तथा माजी खासदार विनायक राऊत यांच्या संपर्क कार्यालयात पार पडलेली ही बैठक उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.

सदर बैठकीस राजापूर तालुकाप्रमुख श्री. कमलाकर कदम, लांजा तालुकाप्रमुख श्री. युवराज हांदे, नवनिर्वाचित रत्नागिरी तालुकाप्रमुख श्री. मयुरेश पाटील, शहरप्रमुख श्री. प्रशांत साळुंखे, सचिन उर्फ भैय्या कदम, सौ. शिवानी माने, उपजिल्हा संघटिका सौ. सायली पवार, रशिदा गोदड, रत्नागिरी महिला विधानसभा क्षेत्र संघटिका सौ. अनिशा नागवेकर, तालुका महिला संघटिका सौ. ममता जोशी, सौ. पूर्वा मुळे, जिल्हा परिषद सदस्या सौ. विशाखा कुवळेकर, नगरसेवक श्री. विनय गुरव, श्री. अमित विलणकर, नगरसेविका सौ. फौजिया मुजावर, उपजिल्हा युवा अधिकारी श्री. संतोष हातणकर, तालुका अधिकारी श्री. संदेश नारगुडे, शहर सचिव श्री. प्रशांत मुळ्ये, युवासेना शहरप्रमुख श्री. आशिष चव्हाण, चिपळूण तालुका प्रसिद्धीप्रमुख श्री. सचिन चोरगे व रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सर्व उपतालुकाप्रमुख, विभागप्रमुख, उपशहरप्रमुख, युवासेना, महिला आघाडी, युवती सेना, शिव सहकार सेना, रिक्षा सेना व अंगीकृत संघटनांतील सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.