सावर्डे : सह्याद्री शिक्षण संस्थेच्या Sahyadri Polytechnic, Sawarde येथे दिनांक 17 एप्रिल 2026 रोजी “S. Creators 2026” या प्रोजेक्ट एक्झिबिशनचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 10.00 ते सायंकाळी 5.00 या वेळेत होणाऱ्या या प्रदर्शनात विद्यार्थ्यांचे विविध नाविन्यपूर्ण आणि तंत्रज्ञानाधारित प्रकल्प सादर केले जाणार आहेत.
या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून दैनिक सागरचे ज्येष्ठ पत्रकार तसेच Sagar Wave या यूट्यूब न्यूज चॅनलचे प्रमुख सुनील साळवी, उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार शेखर निकम यांच्या हस्ते होणार असून, अध्यक्षस्थानी अनिरुद्ध शेखर निकम राहणार आहेत. संस्थेचे प्राचार्य एम. आर. भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
या प्रदर्शनामध्ये अभियांत्रिकीच्या विविध शाखांतील विद्यार्थ्यांनी तयार केलेले प्रकल्प, स्टार्टअप कल्पना, तसेच नवकल्पनांचा समावेश असणार आहे. उद्योग, तंत्रज्ञान आणि समाजोपयोगी संकल्पनांचा संगम या प्रदर्शनातून पाहायला मिळणार आहे.
सदर कार्यक्रमास विद्यार्थी, पालक, उद्योजक तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
सावर्डे येथे उद्यापासून “S. Creators 2026” प्रोजेक्ट एक्झिबिशन
