चिपळूण : अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज अन्नछत्र मंडळ (अक्कलकोट ) सर्वेसर्वा, संस्थापक अध्यक्ष मान..श्री. जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले आज सायंकाळी चिपळूण चे ग्रामदैवत श्रद्धास्थान श्री जुना कालभैरव – श्री देवी जोगेश्वरी यांचे दर्शन घेतलेआणि श्री जुना कालभैरव मंदिराचे प्रगतीथावर असलेलं भव्य दिव्य जीर्णोद्धार कामकाजाची माहिती घेऊन प्रत्यक्ष पाहणी करून समाधान व्यक्त केले. याप्रसंगी श्री ग्रामदैवत जुना कालभैरव देवस्थान ट्रस्ट, चिपळूण विद्यमाने सन्मा. श्री.जनमेजयराजे भोसले यांना श्रींचा सन्मान पूर्वक प्रसाद देतांना देवस्थान विश्वस्त सर्वश्री पंकज कोळवणकर, समीर शेट्ये, सुमंता शिंदे, पुजारी श्री. कमलाकर अरमारे ( गुरव ), भैरवसेवक सर्वश्री गणेश खेडेकर, निखिल रतावा, कालभैरव भक्त सर्वश्री अंबरीश उर्फ दादा खातू, स्वामी भक्त सर्वश्री महंत स्वामी, दत्ता माने ( अक्कलकोट ) आदी उपस्थित होते. सन्मा. श्री.जनमेजयराजे भोसले यांनी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ (अक्कलकोट ) सोलापूर विद्यमाने श्री ग्रामदैवत जुना कालभैरव मंदिर जीर्णोद्धार निधित भरघोस प्रथम पुष्प अर्पण केले.