रायगड (मनोज खांबे) : किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याचा प्रारंभ आज पासून सुरू झाला असून छत्रपती संभाजीराजे आणि युवराज शहाजीराजे पायरी मार्गाने किल्ले रायगड वर रवाना झाले आहेत.
माने दरवाजा मार्गावर छत्रपती संभाजीराजे आणि युवराज शहाजीराजे यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.लाखो शिवभक्त किल्ले रायगडावर दाखल होत आहेत
या शिवराज्याभिषेकाला लाखोंच्या संख्येने शिवभक्त दाखल झाले आहे त्यांनी हा आपला लोकोत्सव अतिशय आनंदात साजरा करावा तसेच आपला गड आहे हे समजून गडावर स्वच्छता राखावी असे आवाहन छत्रपती संभाजी राजे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केले.