दापोली:- रक्षाबंधनाचा सण केवळ भाऊ-बहिणीच्या नात्यापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या दापोली नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा कृपा शशांक घाग यांनी गतवर्षीप्रमाणे यंदाही पत्रकारांसोबत अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरे केले.
यावेळी नगराध्यक्षा कृपा घाग यांनी दापोलीतील पत्रकार बंधू-भगिनींच्या मनगटावर राखी बांधून त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल गौरव केला. समाजातील विविध प्रश्नांना वाचा फोडत लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकार बजावत असलेल्या भूमिकेचे त्यांनी यावेळी कौतुक केले.
या रक्षाबंधन सोहळ्यास दापोली नगरपंचायतीच्या नगरसेविका प्रीती शिर्के, अश्विनी लांजेकर, रिया सावंत, तसेच माजी नगराध्यक्ष रसिका पेटकर, नवनिर्वाचित दापोली शहरप्रमुख सुनील रिसबूड, युवा शहरप्रमुख स्वप्निल पारकर, माजी नगराध्यक्ष राजू पेठकर, विलास शिगवण, आरिफ मेमन शशांक घाग, सुयोग घाग, प्रीतम शिंदे मंदार केळकर,आदी मान्यवर उपस्थित होते.
पत्रकार आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील स्नेह व आपुलकीचे नाते अधिक दृढ करणारा हा उपक्रम उपस्थितांसाठी विशेष ठरला.
रक्षाबंधनाच्या निमित्ताने दापोलीतील पत्रकारांचा सन्मान; कृपा घाग यांचा स्तुत्य उपक्रम…
