दापोली :- दापोली शहरातील प्रसिद्ध उत्साही कार्यकारी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या ‘मानाचा गणपती’ मंडळाच्या
उपाध्यक्षपदी संदीप केळकर यांची निवड करण्यात आली आहे. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत त्यांच्या नावावर सर्वानुमते शिक्कामोर्तब करण्यात आले.
सामाजिक, सांस्कृतिक तसेच धार्मिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेणाऱ्या संदीप केळकर यांच्यावर मंडळाच्या उपाध्यक्षपदी महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. गणेशोत्सवाच्या काळात विविध धार्मिक कार्यक्रम, सांस्कृतिक उपक्रम, सामाजिक जनजागृतीपर कार्यक्रम तसेच भक्तांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्याचा मंडळाचा प्रयत्न राहणार आहे.
दापोलीतील ‘मानाचा गणपती’ म्हणून या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला विशेष महत्त्व असून, दरवर्षी मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो. मंडळाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत विविध विधायक उपक्रम राबविले जातात.
संदीप केळकर यांची अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, मित्रपरिवार व दापोलीतील नागरिकांकडून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या नेतृत्वाखाली मंडळाच्या आगामी कार्याला अधिक व्यापक स्वरूप मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.