मुंबई : आयनोली-चंडिकानगर, दापोली या छोट्याशा गावातून जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेतलेल्या तुषार गंगाराम माने यांनी स्वतःच्या बचतीतून अल्प भांडवलात व्यवसायाची सुरुवात करून अवघ्या आठ वर्षांत इव्हेंट इंडस्ट्रीमध्ये कोट्यवधींचा व्यवसाय उभा केला. मेडिकल असोसिएशन्स व फार्मास्युटिकल कंपन्यांसाठी देशभरात कॉन्फरन्स, अवॉर्ड सेरेमनी व विविध भव्य कार्यक्रमांचे आयोजन करणाऱ्या तुषार माने यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल ‘महाराष्ट्र आयडॉल युवा उद्योगरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
समृद्ध मराठी चेंबर ऑफ कॉमर्स आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्राचे फलोत्पादन व रोजगार हमी योजना मंत्री तथा रायगडचे पालकमंत्री श्री. भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते, १ सप्टेंबर २०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर, दादर येथे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी ग्लोबल कोकणचे संजय यादवराo व दत्तात्रय वारे गुरुजी उपस्थित होते.
या सन्मानाचे श्रेय तुषार माने यांनी देवाची कृपा, आई-वडिलांचे आशीर्वाद, कुटुंबाचा पाठिंबा आणि आपल्या टीमच्या मेहनतीला दिले.