चिपळूण : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ कर्मचारी श्री गणेशोत्सव मंडळ, लोटे-चिपळूणतर्फे सालाबादप्रमाणे यंदाही गणेशोत्सव आणि विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. यंदा मंडळाचे ३५ वे वर्ष असून, त्यानिमित्ताने ‘श्री केदारनाथ धाम व बारा ज्योतिर्लिंग दर्शन’ हा देखावा साकारण्यात आला आहे.

उत्सवाच्या १० दिवसांत भाविकांसाठी विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये आरोग्य तपासणी शिबिर, तसेच लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच, २३ सप्टेंबर २०२६ रोजी मंडळाच्या वतीने सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले असून, सर्व गणेशभक्तांनी दर्शन व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

MIDCच्या समस्त कर्मचारी वर्गाच्या वतीने भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.