मुंबई : देशाचे यशस्वी पंतप्रधान माननीय श्री. नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या ‘ड्रग्ज फ्री इंडिया’ या संकल्पाला पुढे नेत आणि मुख्यमंत्री माननीय श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली बेलापूरच्या लोकप्रिय आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या पुढाकाराने आयोजित ‘मिशन युथ: व्यसनमुक्त नवी मुंबई’ हा भव्य सोहळा आज सिडको एक्झिबिशन सेंटर, वाशी येथे अतिशय उत्साहात पार पडला!

या कार्यक्रमाला नवी मुंबईतील हजारो तरुण-तरुणी, विद्यार्थी आणि पालकांनी उत्स्फूर्त हजेरी लावली. आमदार मंदाताई म्हात्रे यांनी उपस्थितांशी थेट संवाद साधून व्यसनमुक्तीचा आणि सशक्त युवा पिढी घडवण्याचा ऐतिहासिक संकल्प केला.

या सोहळ्याला भाजप महामंत्री निलेश म्हात्रे, प्राप्ती म्हात्रे,
डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या मॅनेजिंग डायरेक्टर राजलक्ष्मी पाटील, सीईओ सेंट मेरी स्कूल फादर जोसेफ, नवी मुंबई क्राईम ब्रँच नारकोटिक्स सेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप निगडे, डॉ. ऋषभ वर्मा (MBBS, MD Psychiatrist), समाजसेविका अनिता शेट्टी, पोलीस पाटील दिलीप पाटील आणि माजी नगरसेवक राजू शिंदे,समाजसेवक पाशा भाई यांसारख्या प्रमुख मान्यवरांची विशेष उपस्थिती लाभली.
तसेच सर्व कॉलेज चे युवक-युवती,शिक्षक,पत्रकार,पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवी मुंबई पूर्णपणे ड्रग्ज फ्री होईपर्यंत हा लढा असाच सुरू राहील!