गुहागर : अखिल भजन सांप्रदाय हितवर्धक मंडळ, गुहागर तालुका यांच्या वतीने यंदाचा ‘श्रावण भजन महोत्सव २०२६’ उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.दिनांक 23 ऑगस्ट रोजी श्रावण भजन महोत्सव भंडारी भवन गुहागर येथे साजरा होणार आहे. भजन रसिकांनी, भजनी प्रेमींनी, भजन कलाकारांनी जास्त संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.
भजनाची परंपरा टिकवून ठेवणे, भजनाच्या माध्यमातून भक्ती व समाजप्रबोधनाचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवणे तसेच भजनी कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, हा महोत्सवामागील प्रमुख उद्देश आहे. मागील वर्षीही गुहागरमध्ये श्रावण भजन महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता.
यंदाच्या महोत्सवात भजनी मेळाव्याचे नियोजन, भजन सम्राट बुवा यांचा ७५ वा वाढदिवस साजरा करण्यात ऐणार आहे. गुहागर तालुक्यातील सर्व भजनी मंडळांनी, बुवा तसेच भजन मंडळांचे प्रतिनिधी यांनि महोत्सव यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन अखिल भजन सांप्रदाय हितवर्धक मंडळाचे अध्यक्ष श्री. सागर मोरे आणि सचिव श्री. संदेश हुमणे यांनी केले आहे.