पेण (प्रशांत पोतदार) : पेण तालुक्यातील बळवली पंचक्रोशीतील आंदोलनाचा सकारात्मक परिणाम झाला आहे.मेघा इंजिनिअरिंग कंपनी व्यवस्थापनाने आंदोलकांच्या मागण्या मान्य केल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.तहसीलदार तानाजी शेजाळ यांच्या मार्फत आंदोलनाचे प्रमुख सामाजिक कार्यकर्ते हरिष बेकावडे तसेच बळावली,पंचक्रोशी,ग्रामस्थ,शेतकरी यांना मागण्या मान्यतेबाबत पत्र देण्यात आल्याने आंदोलकांनी सुरू असलेले आमरण साखळी उपोषण मागे घेण्यात आले असल्याचे सामाजिक कार्यकर्त्ये हरिष बेकावडे यांनी माहिती देताना सांगितले.

यावेळी मुख्य मागण्या यशस्वी झाल्याने आंदोलकांनी उपोषण सोडले त्यात मुख्य मागण्या पाणी व्यवस्थापन – मेघा इंजिनिअरिंग प्रा.लि. कंपनीकडून रॉ वॉटर टनल मधून निघणारे पाणी नदिपात्रात न सोडता ते पाईप लाईन व्दारे सहा कि.मी.अंतरावर असलेल्या खाडीमध्ये सोडण्याचे काम १५ दिवसामध्ये सुरु करणार तसेच नुकसान भरपाई – सदर रॉ वाटर टनेल मधून नदी पात्रात सोडलेल्या पाण्यामध्ये बाधीत शेतक-यांच्या शेतीपीकाची नुकसान भरपाई शासन नियमाप्रमाणे किंवा इतर मार्गाने घेणे बाबत कंपनी प्रशासनस्तरावरुन दोन दिवसात निर्णय घेवून तहसिलदार यांना कळविण्यात येणार आहे तर कायमस्वरूपी पाणी पुरवठा – सिडको प्रशासनाकडून कायम स्वरुपी पाणी पुरवठा करणेबाबत उपाययोजना चालू आहे असल्याचे मेघा इंजिनिअरिंग व्यवस्थापनाने तहसीलदार यांना पत्राद्वारे कळवण्यात आले आहे.

आंदोलनस्थळी तहसीलदार तानाजी शेजाळ यांच्या मार्फत आंदोलनाचे प्रमुख सामाजिक कार्यकर्ते हरिष बेकावडे व उपस्थित बळवली ग्रामपंचायत हद्दीतील रमेश पाटील व इतर सर्व सहकारी ग्रामस्थ यांना लेखी पत्र देण्यात आले.