खेड : खेड तालुक्यातील बिजघर गावामध्ये कोंडवाडी या ठिकाणी पालखी उत्सवामध्ये यावर्षी प्रथमच संकासुर अवतरला आणि उपस्थित नागरिकांनी व त्यांनी धमाल मस्ती केल्याचे दिसून आले.
बिजघर या गावामध्ये बारा वाड्या असल्यामुळे रंगपंचमी नंतर देखील शिमगोत्सव सुरू असतो. या सणासाठी प्रत्येक वाडीतील चाकरमानी मोठ्या उत्साहाने आणि आतुरतेने दाखल होतात. यावेळी घरोघरी पालखीचे येथासंग स्वागत करून ग्रामदेवतेची मोठ्या भक्ती भावाने पूजा चर्चा करतात. यासोबतच पालखी नाचवण्याचा कार्यक्रम देखील प्रेक्षणीय असा असतो. अशा मध्येच यावर्षी प्रथमतःच संकासुराचे आगमन बिजघर कोंडवाडी या ठिकाणी झाल्याचे दिसून आले.यावेळी लहान मोठ्या सर्वांनी संकासुरा सोबत धमाल मस्ती केल्याचे दिसून आले.याचे नियोजन शिवपार्वती प्रतिष्ठान बिजघर कोंडवाडी यांच्या वतीने करण्यात आले होते.या उपक्रमाचे गावातून कौतुक करण्यात आले.
