रायगड ( मनोज खांबे ) : महाडच्या ऐतिहासिक चवदार तळे सत्याग्रहाच्या 99 व्या वर्धापन दिनाला 20 मार्च रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,मुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह केंद्रीय मंत्री आणि राज्यातील काही मंत्री उपस्थित राहणार असल्याची माहिती मंत्री भरतशेठ गोगावले यांनी आज प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.


राज्याच्या सामाजिक न्याय विभागा कडून चवदार तळेच्या सौंदर्यकरणासाठी 55 कोटी रुपयाचा निधी मंजूर केला आहे.या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली तर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या कामाचे भूमिपूजनही करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री गोगावले यांनी यावेळी दिली.