पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांच्या कार्यकर्तृत्वावर आकसापोटी प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या रोहित पवार तसेच इतर नेतृत्वाच्या भूमिकेचा आज राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.
राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा वैशाली नागवडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुण्यातील सारसबाग येथील राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यासमोर हे निषेध आंदोलन करण्यात आले.
यावेळी महिला पदाधिकाऱ्यांनी सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाला आणि कार्यकर्तृत्वाला पाठिंबा व्यक्त करत, त्यांच्या सार्वजनिक जीवनातील योगदानाबाबत जाणीवपूर्वक गैरसमज निर्माण करण्याच्या प्रयत्नांना विरोध दर्शविला. या निषेध आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
