मंडणगड : तालुक्यातील तिडे आदिवासीवाडी येथील ताई शांताराम जाधव (वय ५६) या महिला घरातून कोणासही काहीही न सांगता निघून गेल्याने बेपत्ता झाल्या आहेत. याप्रकरणी मंडणगड पोलीस ठाण्यात त्या नापत्ता असल्याची नोंद करण्यात आली असून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ताई शांताराम जाधव या २७ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास तिडे आदिवासीवाडी, ता. मंडणगड येथील आपल्या घरातून कोणास काहीही न सांगता निघून गेल्या. त्यानंतर त्यांचा शोध आजूबाजूच्या गावांमध्ये तसेच नातेवाईकांकडे घेण्यात आला; मात्र त्यांच्याबाबत कोणतीही माहिती मिळून आली नाही. बेपत्ता महिलेची उंची सुमारे ५ फूट ३ इंच, रंग निमगोरा, चेहरा गोल, नाक सरळ व डोळे काळे आहेत. बेपत्ता होताना त्यांच्या अंगावर लाल रंगाची साडी व पिवळ्या रंगाचा बारीक फुलांची नक्षी असलेला ब्लाउज होता. गळ्यात काळ्या मण्यांचे मंगळसूत्र आहे या प्रकरणाची नोंद मंडणगड पोलीस ठाण्यात नापत्ता रजिस्टर क्रमांक २०/२०२६ नुसार करण्यात आली असून या प्रकरणाचा तपास पोहेकॉ सुहास सुरेश मांडवकर हे करीत आहेत.
सदर महिलेबाबत कोणास काही माहिती मिळाल्यास किंवा त्या आढळून आल्यास मंडणगड पोलीस ठाण्याशी अथवा तपासी अंमलदार पोहेकॉ सुहास मांडवकर (मो. ८२०८९३०७०२) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.