दापोली ( वार्ताहर ) : आजच्या संघर्षाच्या युगात महिलांनी आपले विचार बदलत आर्थिक उन्नतीचा धागा पकडून व आर्थिक नियोजन करून उद्योजक बनावे बळीराज सेनेचे वतीने अशा गरजू महिलांना आवश्यक मार्गदर्शन व मदत देण्यात येईल असे प्रतिपादन बळीराज सेना जिल्हा अध्यक्ष श्री पराग कांबळे यांनी आज पार पडलेल्या एका मेळाव्यात केले दापोली येथील पेन्शनर्स सभागृहात तालुका अध्यक्ष श्री काशीराम पोसकर यांचे अध्यक्ष तेखाली पार पडलेल्या कार्यक्रम मध्ये ते बोलत होते यावेळी व्यसलीठावर विधानसभा संपर्क प्रमुख श्री सूर्यकांत पागडे तालुका महिला आघाडी अध्यक्ष श्रीमती निकिता बाळगूडे सौ मीनाक्षी शिर्के आदी मान्यवर उपस्थिती होते सर्वप्रथम श्रीमती बाळगूडे यांनी सर्वांना महिला दिनाच्या शुभेच्छा देत सर्वांचे स्वागत केले दापोली तालुका बळीराज सेनेच्या वतीने तालुका अध्यक्ष श्री काशीराम पोसकर यांनी जिल्हा अध्यक्ष श्री पराग कांबळे यांचा शाल श्रीफल व पुष्पगुछ देऊन सत्कार केला त्यांना नंतर दीप प्रज्वल करून प्रारंभ झाला यावेळी उद्योग कसा करावा याबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले उपस्थिती त महिलांनी देखील आपले विवार प्रगट केले चर्चा सत्र यशस्वी केल्या बद्दल श्रीमती निकिता बाळगूडे यांनी दापोली तालुका बळीराज सेनेच्या वतीने सर्वांचे आभार मानले दापोली तालुक्यातील महिला साठी नियोजित महिला मेळावा घेण्यासाठी उपस्थिती त महिलांनी मागणी केली कार्यकम खेळीमेळीच्या वातावरणात पार पडला