खोपोली : खोपोली शहरातील सामाजिक संस्था विक्रम साबळे फाउंडेशन याच तर्फे महाराजा मंगल कार्यालयात मंगळागौर कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सभागृहा बाहेर जोरदार पाऊस पडत असतानाही महिलांची झालेली गर्दी पाहून, स्पर्धकांनी पारंपारिक पद्धतीने मोठ्या उत्साहात आपली कला सादर केली. एकूण आठ संघापैकी पाच संघ या स्पर्धेत उपस्थित होते या स्पर्धेला सिने अभिनेत्री ऋतुजा बागवे, सामाजिक कार्यकर्त्या कल्याणी शेंडे, नगरसेविका अश्विनी अत्रे, नियोजन सभापती प्रतीक्षा रेटेre कर, सानिया शेख, भाजप शहराध्यक्ष अजय इंगुलकर, भाजप क्रीडा विभागाचे शरद कदम, सरचिटणीस विनायक माडपे, विकास नाईक सह मोठ्या प्रमाणात महिला कार्यकर्त्या, उपस्थित होते

उपनगराध्यक्ष विक्रम साबळे व माजी नगरसेवक अविनाश तावडे व विक्रम साबळे फाउंडेशन चे सर्व सदस्य यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. या कार्यक्रमासाठी विजेत्या स्पर्धकांना तसेच भाग घेतलेल्या स्पर्धकांना मोठ्या प्रमाणात रोख पारितोषिके तसेच भेटवस्तू देण्यात आल्या. या कार्यक्रमाला खोपोली तसेच खालापूर व कर्जत भागातील महिलांनी उपस्थिती दर्शवली होती पारितोषिक वितरण उपनगराध्यक्ष विक्रम साबळे, अभिनेत्री ऋतुजा बागवे, अविनाश तावडे यांच्या हस्ते करण्यात आले.

विशेष म्हणजे या कार्यक्रमात ऋतुजा बागवे यांनी स्पर्धकांना बरोबर फुगडी चा आस्वाद घेतला