चिपळूण : मंडप डेकोरेटर्स मित्र मंडळ चिपळूण आयोजित श्री ग्रामदैवत जुना कालभैरव देवस्थान प्रांगण – कै. सुरेश (अप्पा ) शेट्ये क्रिडांगणात बांधण्यात आलेली मानाची दहीहंडी फोडण्याचा सन्मान श्री गांधारेश्वर गोविंदा पथक, मुरादपूर चिपळूण यांनी पटकवला त्यांना बक्षीस रुपये- ५५५५/- रोख आणि सन्मानिका तसेच श्री कालभैरवाची पगडी आणि महावस्त्र देऊन सन्मानित करण्यात आले.