चिपळूण : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापिठ, दापोली अंतर्गत असलेल्या गोविंदरावजी निकम कृषि महाविद्यालय, मांडकी-पालवण येथील बी.एस्सी. (कृषि) शाखेच्या अंतिम वर्षाच्या कृषिदूतांनी ग्रामीण कृषि कार्यानुभव रावे कार्यक्रमांतर्गत निवळी येथे शेतकऱ्यांसाठी भात लागवड प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले. या प्रात्यक्षिकामध्ये भाताची रोपे योग्य अंतरावर व सरळ ओळीत लावण्याचे महत्त्व समजावून सांगण्यात आले.

ओळीत लागवड केल्यामुळे पिकाला सूर्यप्रकाश व हवा योग्य प्रमाणात मिळते, तण नियंत्रण सुलभ होते तसेच खत व पाणी व्यवस्थापन अधिक कार्यक्षमपणे करता येते. त्यामुळे उत्पादन वाढीस मदत होते. उपस्थित शेतकऱ्यांनी या प्रात्यक्षिकास उत्स्फूर्त प्रतिसाद देत तंत्रज्ञानाबाबत माहिती जाणून घेतली.

हा संपूर्ण उपक्रम कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. निखिल चोरगे, गोविंदरावजी निकम कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संकेत कदम, जिजामाता कृषि महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शमिका चोरगे, उपप्राचार्य बाळासाहेब सूर्यवंशी, आणि ग्रामीण कृषि कार्यानुभव समन्वयक प्रा. प्रशांत इंगवले पीकशास्त्र विभागाचे प्रा. विघ्नेश सकपाळ यांच्या मोलाच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे राबविण्यात आले. या उपक्रमात शितल डोहळे, वैष्णवी कोकरे, मयूरी गावडे सानिका भोसले आदी कृषिदूतांनी सहभाग घेतला.