रायगड : रायगडचे उपविभागीय पोलीस अधिकारी (डीवायएसपी) उदय झावरे यांचे सुपुत्र उन्मेष समता उदय झावरे यांची भारतीय सैन्यात ‘लेफ्टनंट’पदी निवड झाली आहे. जिद्द, कठोर परिश्रम आणि लष्करसेवेचे स्वप्न उराशी बाळगूनत्यांची पहिली नियुक्ती (पोस्टिंग) आर्मड रेजिमेंट, सिलिगुडी (पश्चिम बंगाल) येथे झाली असून, या यशाबद्दल त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

मूळचे कोल्हापूरचे असणाऱ्या झावरे कुटुंबाने पोलीस खात्यातील बदल्यांमुळे आपले वास्तव्य पुण्यात स्थिर केले. उन्मेष यांनी आपले शालेय शिक्षण ‘सैनिक स्कूल’ आणि ‘एसपीआय (SPI) संभाजीनगर’ येथून पूर्ण केले सुरुवातीला एनडीए (NDA) परीक्षेत यश मिळाले नाही, तरीही त्यांनी हार मानली नाही. पुण्याच्या ‘एस. पी. कॉलेज’मधून B.Sc. चे शिक्षण पूर्ण* करत आणि नोकरी सांभाळत त्यांनी ‘सीडीएस’ (CDS – UPSC) परीक्षेची अविरत तयारी सुरू ठेवली. सलग तीन वर्षांच्या खडतर परिश्रमानंतर त्यांनी सीडीएस आणि एसएसबी (SSB) परीक्षा उत्तीर्ण केली

सप्टेंबर २०२५ ते सप्टेंबर २०२६ या कालावधीत उन्मेष यांनी ‘ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी (OTA), चेन्नई’ येथे एक वर्षाचे अत्यंत खडतर लष्करी प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले आणि भारतीय सैन्यात अधिकारी म्हणून ते रुजू होत आहेत.

देवरुख पोलीस ठाण्यात यशस्वी सेवा बजावून जुलै २०२६ मध्ये रायगड येथे डीवायएसपी पदावर पदोन्नत झालेले वडील उदयजी झावरे आणि ज्ञान प्रबोधिनीच्या माध्यमातून नवीन पिढीवर सुसंस्कार घडवणाऱ्या आई सौ. समता झावरे यांच्या साध्या राहणीचा, संयमाचा आणि त्यागाचा मोठा वाटा उन्मेष यांच्या यशात आहे. उन्मेष यांचे हे यश केवळ त्यांच्या कुटुंबासाठीच नव्हे, तर संपूर्ण समाज आणि गुरुजनांसाठी अत्यंत अभिमानास्पद ठरले आहे.