गुहागर : गुहागर शहरातील खालचापाट येथे आज रात्री सुमारे १.४९ वाजण्याच्या दरम्यान श्री. सचिन बामणे यांच्या राहत्या घराला आग लागल्याची घटना घडली. आगीची माहिती मिळताच CISF आणि कोकण LNG यांच्या अग्निशमन दलाने तसेच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली.

या आगीत घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, सुमारे १४ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, ही दिलासादायक बाब आहे. आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली, याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही.