सावंतवाडी : गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडीच्या बाजारपेठेत फळांची मोठी आवक झाली आहे.बाप्पांच्या नैवेद्यासाठी आणि माटवीच्या सजावटीसाठी फळांची खरेदी मोठ्या प्रमाणात होत आहे. मात्र यंदा फळांच्या दरांनी चांगलीच उसळी घेतल्याने गणेशभक्तांच्या खिशाला झळ बसत आहे.
विशेष म्हणजे ऐन गणेशोत्सवात मद्रासी आंबा बाजारात दाखल झाला असून त्याचा दर तब्बल 300 रुपये किलो आहे. तर सफरचंद, डाळिंब, संत्री, द्राक्षांसह इतर फळांचे दरही वाढले आहेत. त्यामुळे बाप्पांच्या स्वागताचा उत्साह असला तरी वाढलेल्या दरांमुळे सर्वसामान्यांच्या बजेटचे मात्र गणित बिघडले आहे.
