मुंबई- अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गाच्या मूल्यसंस्कार विभागातर्फे भिवंडी येथे गुरुपुत्र श्री नितीनभाऊ मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत विभाग सक्षमीकरण मेळावा भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. याच निमित्ताने श्री गुरुपूजन, मातृ-पितृ पाद्य पूजन, सरस्वती पूजन व संस्कार सोहळा संपन्न झाला.

या मंगल सोहळ्यातून गुरुसेवा, मातृ-पितृ कृतज्ञता, ज्ञानोपासना आणि सुसंस्कार यांचा प्रभावी संदेश देण्यात आला. आदरणीय नितीनभाऊंच्या मार्गदर्शनामुळे सेवेकऱ्यांना विभागीय कार्य अधिक सक्षमपणे पुढे नेण्याची नवी प्रेरणा मिळाली.