खेड : गणपती बाप्पा मोरया या पुढच्या वर्षी लवकर या नामघोषात शनिवारी पाच दिवसांच्या गौरी – गणपती चे विर्सजन खेडमधील जगबुडी व नांरगी नदीच्या विर्सजन घाटावर मोठ्या उत्साहात पार पडले. गणेश चतुर्थीच्या दिवशी गणरायाचे घरोघरी उत्साहपूर्ण वातावरणात आगमन झाले. तमाम भक्तांचे आराध्य दैवत गणरायाचे गणेश चतुर्थीच्या दिवशी आगमन झाल्यानंतर पाच दिवसांचे गौरी – गणपती विसर्जन खेड मध्ये पार पडले.
खेडमधील १०५८० गणेश मुर्तीचे व ५५५० गौरीचे विसर्जन येथील जगबुडी व नारंगी नदीच्या विर्सजन घाटावर जल्लोषी वातावरणात झाले. तर यावेळी शहरातील मुरलीमनोहर गणेशोत्सव मंडळाच्या मुर्तीसह आणखी पाच सार्वजनिक गणपतीचे विर्सजन करण्यात आले. विर्सजनासाठी दोन्ही नद्यांच्या विर्सजन घाटावर नागरीकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. हा विर्सजन सोहळा शांततेच्या वातावरणात व शिस्तबद्द रितीने पार पडला. आज सकाळपासुनच पावसाची रिमझीम सुरूच होती. त्यामुळे गणेशभक्तांना आपल्या लाडक्या गणरायाला विर्सजन घाटावर घेऊन जाताना फारच कसरत करावी लागली. आपल्या लाडक्या दैवतांची सेवा करून त्यांची मनोभावे आराधना करून त्यांचा आर्शिवाद घेऊन खेडमधील शेकडो भक्तगणांनी आपल्या लाडक्या विघ्नहर्त्यांला निरोप दिला. यावेळी कोणताही अनुचीत प्रकार घडू नये म्हणून खेड पोलीसांनी गर्दीच्या ठिकाणी बंदोबस्त ठेवला होता.