खेड : शहरातील इकरा जाकीर पांगारकर हिने वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञानात अव्वल स्थान मिळवून मोठ्या यशाला गवसणी घातली आहे. कु. इकरा हिने नवी मुंबई येथील महात्मा गांधी आरोग्य विज्ञान संस्थेतून बी.एस. सी. पदवीव्दारे वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञान हि विशेष पदवी संपादन केली आहे. त्याबरोबरच तिने अनिवार्य फिरती वैद्यकीय इंटर्नशिप सुध्दा यशस्वीरित्या पूर्ण केली आहे.
कु. इकरा हि मरहूम अब्दुल करीम शेखहसन पांगारकर तसेच अब्दुल सत्तार शेख हसन पांगारकर यांची नात आणि मरहूम जाकीर पांगारकर यांची कन्या व इस्माईल पांगारकर यांची पुतणी आहे. कु. इकराने आपल्या मेहनतीने, जिद्दीने आणि सातत्यपूर्ण प्रयत्नानी हे यश संपादन करून पांगारकर कुटुंबाचे नाव अभिमानाने उंचावले आहे. तिच्या या यशामागे कुटुंबाचे मोलाचे योगदान आहे.
खेडची कु. इकरा जाकीर पांगारकर वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञानात अव्वल !
