रत्नागिरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आज १७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ‘एक दिवा आशीर्वादाचा’ हे विशेष अभियान आयोजित करण्यात आले आहे. या अभियानात दक्षिण रत्नागिरी जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन दक्षिण रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांनी केले आहे.

‘एक दिवा आशीर्वादाचा, एक दिवा विकसित भारताच्या संकल्पाचा आणि एक दिवा २५ वर्षांच्या सेवाभावाच्या सन्मानाचा’ या संकल्पनेतून हे अभियान राबविण्यात येत असल्याचे यादव यांनी सांगितले.

१७ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता आपल्या बूथवरील प्रत्येक घरात तसेच सार्वजनिक ठिकाणी आशीर्वादाचा दीप प्रज्वलित करून या अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

दीपप्रज्वलन केल्यानंतर त्याचा फोटो संबंधित लिंकवर पाठवावा, अशी विनंतीही करण्यात आली आहे. विकसित, आत्मनिर्भर आणि समर्थ भारताच्या संकल्पाला सहभागातून बळ देण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या विशेष अभियानात सहभागी व्हावे, असे यादव यांनी म्हटले आहे.

‘आपला एक दिवा, आपला एक आशीर्वाद विकसित भारताच्या संकल्पाला नवी ऊर्जा देणारा ठरो,’ असे आवाहन प्रशांत यादव यांनी केले आहे.

फोटो पाठविण्यासाठी लिंक:
https://forms.gle/TsQPZpBYLYk4vhCB6