चिपळूण : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चिपळूण येथील प्रधान कार्यालयातील सहायक सरव्यवस्थापक संतोष जाधव यांचे चिरंजीव डॉ. सोहम जाधव यांनी फिजिओथेरपीची पदवी प्राप्त केल्याबद्दल त्यांचा विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. सोहम जाधव यांच्या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
डॉ. सोहम जाधव यांनी फिजिओथेरपी क्षेत्रातील पदवी संपादन करून वैद्यकीय क्षेत्रात महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. त्यांच्या या यशाबद्दल कुटुंबीयांसह मित्रपरिवार आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आनंद व्यक्त करत त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष नितीन ठसाळे, पंचायत समितीचे माजी सदस्य अनिल दाभोळकर, खेर्डी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष राजेंद्र जाधव, विनोद खताते, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या दिशा दाभोळकर, खेर्डी ग्रामपंचायतीचे सदस्य राकेश दाभोळकर, अभिजीत खताते, रियाज खेरटकर, नवनाथ जाधव आदी उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांनी डॉ. सोहम जाधव यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. सातत्यपूर्ण मेहनत, जिद्द आणि अभ्यासाच्या बळावर त्यांनी मिळविलेल्या या यशाचे सर्वांनी कौतुक केले. फिजिओथेरपी क्षेत्रात पुढील काळात उल्लेखनीय कार्य करून रुग्णसेवेसाठी योगदान द्यावे, अशा शुभेच्छाही यावेळी मान्यवरांनी दिल्या.
संतोष जाधव यांच्या चिरंजीवाने वैद्यकीय क्षेत्रातील महत्त्वाची पदवी संपादन केल्याने जाधव कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण असून, डॉ. सोहम जाधव यांच्या पुढील शैक्षणिक व व्यावसायिक वाटचालीसाठी उपस्थितांनी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
