रत्नागिरी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार पक्षाच्या रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीने संघटन बांधणी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद तसेच तालुकानिहाय संघटनात्मक आढावा घेण्यासाठी शनिवार, दि. २२ ऑगस्ट २०२६ रोजी जिल्हास्तरीय संघटनात्मक पदाधिकारी संवाद दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या दौऱ्यामध्ये पक्षाचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सुरेश उर्फ बारक्या शेट बने, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा सौ. दीपिका कोतवडेकर, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष वासू आप्पा मेस्त्री, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सूरज शेट्ये, अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष रईस अल्वी, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष अक्षय केदारी तसेच राष्ट्रवादी सेवादलचे जिल्हाध्यक्ष याकूब खान यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध तालुक्यांमध्ये संघटनात्मक आढावा व पदाधिकारी-कार्यकर्ता संवाद बैठका होणार आहेत.
या दौऱ्याची सुरुवात सकाळी ११ वाजता खेड येथे होणार असून, तालुक्यातील संघटनात्मक परिस्थितीचा आढावा घेण्यात येणार आहे. तसेच आगामी काळातील संघटन बांधणी आणि पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला जाणार आहे.
त्यानंतर दुपारी १ वाजता दापोली येथे तालुक्यातील संघटनात्मक आढावा बैठक होणार आहे. पक्षविस्ताराच्या दृष्टीने पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधून आगामी काळातील नियोजनाबाबत चर्चा करण्यात येणार आहे.
सायंकाळी ५ वाजता चिपळूण येथे संघटनात्मक आढावा व पदाधिकारी-कार्यकर्ता संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीस शिरीषभाऊ काटकर व सतीश आप्पा खेडेकर यांचीही उपस्थिती राहणार आहे.
या सर्व बैठका संबंधित तालुकाध्यक्षांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली पार पडणार असून, पक्षाच्या संघटनात्मक बळकटीकरणासाठी आवश्यक बाबींवर चर्चा करण्यात येणार आहे.
या निमित्ताने संबंधित तालुक्यातील तालुकाध्यक्ष, सर्व सेलचे अध्यक्ष व पदाधिकारी, युवक काँग्रेस, महिला काँग्रेस, युवती काँग्रेस, विद्यार्थी काँग्रेस, अल्पसंख्याक सेल तसेच पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते, नगरसेवक, नगरसेविका, पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत सदस्य आणि पक्षाशी संबंधित सर्व लोकप्रतिनिधी व प्रमुख कार्यकर्त्यांनी आपापल्या तालुक्यातील बैठकीस वेळेत व मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.
