मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र शासनाने गेल्या 12 वर्षांत देशाच्या विकासाला अभूतपूर्व गती दिली आहे. गेल्या 12 वर्षात भारताची जागतिक पातळीवरील प्रतिष्ठा उंचावण्यासह आर्थिक, सामाजिक, पायाभूत आणि सांस्कृतिक क्षेत्रांत व्यापक परिवर्तन घडवून आणले असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र शासनाच्या 12 वर्षपूर्ती निमित्त आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. रविंद्र चव्हाण, मुंबई अध्यक्ष आ. अमित साटम, प्रदेश सरचिटणीस आ. निरंजन डावखरे, प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन आदी यावेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांनी सलग 4,398 पेक्षा अधिक दिवस देशाचे नेतृत्व करत सर्वाधिक काळ कार्यरत राहिलेले निर्वाचित पंतप्रधान म्हणून नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 12 वर्षांत भारताने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय प्रगती साधली आहे. सुमारे 25 कोटी नागरिकांना गरिबीरेषेबाहेर काढण्यात यश आले आहे. 81 कोटी नागरिकांना मोफत अन्नधान्याचा लाभ देण्यात आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 12 वर्षांच्या नेतृत्वात भारताचे सर्वांगीण परिवर्तन -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
